सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2023 (10:17 IST)

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराचे स्टिकर्स आता शिर्डीच्या वाहनावर चमकणार

पाच वर्षांत देशासह विदेशातील तब्बल ६१ हजार २०० वाहनांना लागले स्टिकर
 
शिर्डी : येथील श्री मंगळग्रह मंदिराची ओळख देशासह संपूर्ण विश्वातील भाविकांना व्हावी, या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आता शिर्डी येथील वाहनांना मंदिराचा लोगो असलेले स्टिकर लावण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी शिर्डीत झाला.
 
देशातील अति प्राचीन, अति जागृत व दुर्मिळ मंदिरांपैकी एक असल्याने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात मांगलिक व शेती, माती व रेतीची संबध असलेले असंख्य भाविक मोठ्या संख्येने नतमस्तक होतात. भाविकांना मंदिराचे महत्त्व व मांगलिकाच्या विवाहिक अडचणी दूर होण्यासाठी पाच वर्षापासून देशासह विदेशातील तब्बल ६१ हजार २०० वाहनांना मंदिराचा लोगो असलेले स्टिकर लावण्यात आले आहे. त्यामुळे देशभरासह विदेशातीलही अनेक वाहनांवर दृष्टी टाकल्यास अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराचा लोगो हमखास दिसून येत असल्याचे चित्र आहे. यासाठी स्टिकरचा आकार, रंग तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांना स्टिकर लावण्यासाठीची जागा निश्चित करून घेण्यात आलेली आहे. 
 
गेल्या पाच वर्षात आतापर्यंत  मुंबई, नाशिक, पुणे, दिल्लीसह राजस्थान, जयपूर, मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांसह दर्शन व पूजा विधींसाठी मंदिरात आलेल्या भाविकांनी आपल्या वाहनांना स्टिकर लावले आहेत. मंदीराची माहिती अन्य ठिकाणी व्हावी, यासाठी आता शिर्डी, शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, नाशिक, कोल्हापूर, अक्ककोट, अहमदनगर आशा महत्त्वाच्या शहरामध्ये वाहन चालकांच्या परवानगीने वाहनांना मंदिराचा स्टिकर लावण्यात येत आहे. यासह भाविकांना मंगळग्रह देवतेची माहिती होण्यासाठी हॉटेल्स, मंदिर, भक्त निवास, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालयात मंगळग्रह देवतेची प्रतिमा लावली जात आहे. 
 
या मोहिमेच्या शुभारंभ गुरुवारी शिर्डी येथील ३९ रिक्षांना मंदिराचा लोगो असलेला स्टिकर लावून करण्यात आला. यावेळी रिक्षा चालक समाधान पाटील, नंदू सुरासे, सुनील नरोडे, अरुण अहिरे, सचिन सावळे, दिलीप इनामके, माधव इनामके, मंदिराचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, चंद्रकांत सोनार, व्यवस्थापक गणेश सपकाळे व सेवेकरी नितीन सोनवणे आदी उपस्थितीत होते.