1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मार्च 2023 (16:08 IST)

श्री मंगळग्रह मंदिरात नैसर्गिक रंगांनी रंगले भाविक

अमळनेर (जिल्हा जळगाव महाराष्ट्र) :  देशभरात सर्वत्र उत्साहात धूलिवंदन अर्थात धुळवड साजरी होत असताना श्री मंगळग्रह मंदिरात देखील मंगळवार, ७ मार्च रोजी हजारो भाविक अभिषेक व दर्शनासाठी आले होते. यावेळी मंदिराच्या सेवेकर्‍यांनी विविध नैसर्गिक रंग लावून भाविकांचे मंगलमय वातावरणात स्वागत केले. मंदिर परिसरात आनंदी आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
 
श्री मंगळग्रह मंदिरात पहाटे सहा वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक महिला व पुरुष भाविकाचे  सेवेकर्‍यांनी विविध नैसर्गिक रंग लावून स्वागत केले. या अनोख्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या स्वागतामुळे भाविकांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला.
याचवेळी  सेवेकरी व भाविकांनी एकमेकांना होळी व धूलिवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या संकल्पनेतून ही अनोखी धुळवड खेळण्यात आली. यासाठी उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त डी. ए. सोनवणे यांच्यासह सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले.