1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified बुधवार, 29 मार्च 2023 (23:36 IST)

१४ हजार रुपयांचे सापडलेले पाकीट भाविकाने केले परत

mangal dev
अमळनेर:- येथील मंगळग्रह मंदिरात आलेल्या एका महिला भाविकांचे पाकीट परिसरात हरविले होते. ते अहमदनगर येथील भाविकाने परत करीत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. फुलंब्री, जि.छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी गोदावरी ढोले या मंगळवार दि.२८ मार्च रोजी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिर परिसरात भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होती. या गर्दीत सौ.ढोले यांचे पाकीट पडले होते. या पाकिटात तब्बल १४ हजार रुपये रोकड होती. हे पाकीट अहमदनगर येथील विजय फुलारी या भाविकास आढळून आले. त्यांनी पाकीट घेत तात्काळ मंदिराच्या सेवेकऱ्यांशी संपर्क साधून पाकीट सापडल्याची माहिती दिली. सेवेकर्‍यांनी लागलीच मंदिराच्या ध्वनी क्षेपणावरून पाकीट सापडल्याची माहिती दिली. माहिती ऐकून गोदावरी ढोले सेवेकऱ्यांजवळ आल्या व पाकीट त्यांचे असल्याची ओळख पटवून दिली. विजय फुलारी यांच्या प्रामाणिकपणाचे सेवेकर्‍यांनी कौतुक केले तसेच महिला भाविकांनी देखील त्यांचे आभार मानले.