मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (09:32 IST)

मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्‍यांनी गिरविले निरोगी आरोग्याचे धडे, जागतिक योग दिनानिमित्त निशुल्क योग शिबिर

World Yoga Day
अमळनेर- जागतिक योग दिनानिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्‍यांनी निरोगी आरोग्याचे धडे गिरविले. दि २१ जून रोजी सकाळी सहा ते सात या वेळेत निशुल्क आरोग्यदायी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या धावपळीच्या काळात कामामुळे प्रत्येकाला आरोग्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. यामुळे बऱ्याच वेळा आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात. निरोगी आरोग्य राहण्यासाठी  येथील सेवेकऱ्यांसाठी निशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी सेवेकऱ्यांना योगाचे विविध प्रकार करून दाखवीत प्रत्येक आसनाची माहिती देत महत्त्व पटवून दिले. या शिबिरात संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव सुरेश बाविस्कर यांच्यासह श्याम पाटील, ललिता पाटील, श्याम अहिरे, महेश कोठावदे, सुधाकर वाणी, गोपाल बडगुजर, शामकांत पुरकर, नथू ठाकूर या मान्यवरांसह सेवेकर्‍यांनी या योग शिबिरात मोठ्या संख्येने हजेरी लावून निरोगी आरोग्याचे धडे गिरविले.