सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (15:22 IST)

सर्वच शासकीय शाळांमध्ये सीटीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार : वर्षा गायकवाड

राज्यातील शासकीय शाळेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय शाळेत वर्षभरात टप्प्या टप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आशा शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. राज्यात एकूण 65 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून देखील चालणार नाही तर त्याची व्यवस्थित देखभाल होण्याची गरज असल्याचे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
 
राज्य सरकारचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. राज्यात सध्या स्थितीमध्ये एकूण  65 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या तसेच राज्यातील प्रत्येक शाळांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या वर्षाभरात शाळांचा प्राधान्य क्रम ठरवून हे काम पूर्ण केले जाईल. तसेस सर्व खासगी शाळांना देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात येतील असे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.