सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (15:06 IST)

राणे पिता पुत्रावर कारवाई करा, दिशाच्या पालकांची राष्ट्रपतीकडे मागणी

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात संतप्त झालेल्या दिशाच्या आई-वडिलांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे दिशाच्या कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याविरोधात कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी त्याच्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
 
माहितीनुसार, दिशाच्या कुटुंबियांनी फक्त राष्ट्रपतींना नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून मुलीच्या मृत्यूवर सुरू असलेले राजकारण थांबवण्याची मागणी केली आहे.
 
दरम्यान काही दिवसांपूर्वी दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना दिंडोशी न्यायालयाने दिलासा दिला होता. काही अटी, शर्थींसह नारायण राणे आणि नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी न्यायालयाने मंजूर केला होता. दिशा सालियानचा बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता.