कार कंटेनरला धडकून अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू
नंदुरबार -निझर मार्गावर भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत्युमुखी झालेल्यांपैकी एक रेल्वे सुरक्षा दलात कार्यरत होते. हा अपघात रात्री एक वाजेच्या सुमारास घडला. हे तिघे मित्र कारने जात असताना हायवेवर पोहोचली असताना समोरून येणाऱ्या कंटेनर ला जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती की या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हिरालाल पवार, अनिल सोलंकी, आणि प्रशांत सोनावणे असे मृत्युमुखी झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात तिन्ही मित्रांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.