सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 25 मार्च 2022 (12:55 IST)

श्वानाला पिल्लासह झाडाला लटकवून केली हत्या

अलीकडे अमानुषतेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही अज्ञात लोकांनी मुक्या जीवासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 5 येथील साईनाथ कॉलनी परिसरात एका श्वानाला आणि तिच्या पिल्लाला झाडाला लटकवून भयावह पद्धतीने हत्या केली आहे. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना उल्हासनगरातील कॅम्प 5 येथील साईनाथ कॉलनी परिसरात घडली असून येथे 16 मार्च रात्री आरोपींनी श्वानासह तिच्या पिल्ला फास देऊन झाडाला लटकावलं. या घटनेची माहिती 'पीपल फॉर अॅनिमल' संस्थेच्या प्राणीमित्र सृष्टी चुग यांना मिळाल्यानंतर या धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
प्राणीमित्राने स्थानिकांच्या मदतीने श्वानाला आणि पिल्लाला झाडावरून खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवलं आणि नंतर हिल लाईन पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी प्राण्याचा अमानुष छळ प्रतिबंधक कलमाअन्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामागे कोणाचा हात आहे हे मात्र अजून कळू शकलं नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.