उल्लास नगर शासकीय बाल सुधारगृहातील 16 मुलांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील सरकारी बालगृह आणि वसतिगृहात 33 पैकी 16 मुलांचे कोविड अहवाल आले असून त्यांच्यावर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी दिली आहे.
मुलांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काही मुलांना यापूर्वी ताप आणि खोकल्याची तक्रार होती. शिबिर लावून मुलांची चाचणी घेण्यात आली.
शहरात एकून 1 हजार 499 पॉझिटिव्ह रुग्ण असून बहुतांश जणांना सौम्य लक्षणे असल्याची माहिती वैद्यकीय अघिकारी पगारे यांनी दिली. गुरुवारी एकूण 98 कोरोना रुग्ण आढळून आले असून 246 जणांना घरी सोडण्यात आले.