सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (09:14 IST)

दिलासादायक! राज्यात नवीन एकही ओमायक्रॉनबाधित नाही

राज्यातील करोना रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ४० हजारांच्या वर असणाऱ्या रुग्णसंख्येत काहीशी घट झालेली दिसून आली. गेल्या २४ तासात राज्यात ३९,२०७ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात३८,८२४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आत्तापर्यंत राज्यात १, ८६० ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत, त्यापैकी १,००१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

राज्यात आतापर्यंत  ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.९५ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६८ लाख ६८ हजार ८१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के आहे. सध्या राज्यात २३ लाख ४४ हजार ९१९ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर २९६० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून १० हजारांच्या खाली पोहचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या सातत्याने घटत असल्याचे म्हणता येईल. परंतु सोमवारी 5 हजारांवर पोहचलेली रुग्णसंख्या आज मात्र पुन्हा ६ हजारांवर पोहचली आहे. मात्र मृत्यांचे प्रमाण आज काहीसे घटले आहे. गेल्या 24 तासात मुंबई 6149 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 12810 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. काल हीच संख्या 15 हजार 551 इतकी होती. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटत आहे. आत्तापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 9 लाख 48 हजार 744 इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 94 टक्के आहे.

मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 9 लाख 35 हजार 934 इतकी झाली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94 टक्क्यांवर पोहचला आहे. तर रुग्ण दुपट्टीचा दर 61 दिवसांवर गेला आहे.