मुंबईत कोरोनाचा वेग थांबला, सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी नवीन रुग्ण आढळले

coorna
Last Updated: सोमवार, 17 जानेवारी 2022 (20:30 IST)
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. सोमवारी शहरात कोरोनाचे ५९५६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी आणखी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणांमध्ये घट झाल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 50,757 वर आली आहे.

मुंबईत कोरोना विषाणूचे 10 हजारांहून कमी नवे रुग्ण आढळल्याचा आज दुसरा दिवस आहे. रविवारी शहरात ७८९५ नवे रुग्ण आढळले. 4 जानेवारी रोजी शहरात कोविड-19 च्या 10,860 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 6 ते 8 जानेवारी दरम्यान कोरोना विषाणूच्या दैनंदिन संसर्गाची संख्या 20 हजारांच्या वर होती. पण तेव्हापासून रोज नवीन केसेस कमी होऊ लागल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरात नोंद झालेल्या नवीन रुग्णांपैकी 4994 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. तर 479 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, गेल्या 24 तासांत 15561 रुग्ण बरे झाले ही दिलासादायक बाब आहे.
रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे 41,327 नवे रुग्ण आढळून आले असून या आजाराने आणखी 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण संसर्गग्रस्तांची संख्या 72,11,810 झाली असून मृतांची संख्या 1,41,808 झाली आहे. दिवसभरात ओमिक्रॉन प्रकाराची आठ नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर अशा प्रकरणांची संख्या 932 वर पोहोचली आहे . राज्यात कोविड-19 संबंधित मृत्यूचे प्रमाण 1.96 टक्के आहे, तर संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के आहे. आजचे आकडे येणे बाकी आहे.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

IND vs ENG 1st T20 : भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा ...

IND vs ENG 1st T20  : भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला T20 सामना साउथॅम्प्टन येथील रोझ बाउल ...

दिल्लीत हिंसाचार: कँडल मार्च काढणारा जमाव झाला बेकाबू, ...

दिल्लीत हिंसाचार: कँडल मार्च काढणारा जमाव झाला बेकाबू, पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड
दिल्लीतील शाहदरा येथे गुरुवारी संध्याकाळी कँडल मार्च करणाऱ्या जमावाने अचानक पोलिसांवर ...

आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रेची घोषणा

आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रेची घोषणा
शिवसेनेची गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रेची घोषणा केली. आदित्य ठाकरे हे ...

नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच सेनेचं नुकसान ...

नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच सेनेचं नुकसान केलं-केसरकर
पक्ष नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच शिवसेनेचं नुकसान केलं. अनेक गोष्टी संजय ...

नाशिकसह या चार शहरांमध्ये होणार ‘स्वनिधी सांस्कृतिक ...

नाशिकसह या चार शहरांमध्ये होणार ‘स्वनिधी सांस्कृतिक महोत्सव’;काय आहे तो?
केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा यशोत्सव म्हणून या योजनेचे ...