मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (09:03 IST)

मुंबईत अनेक रुग्णांची कोरोनावर मात, त्यात पूर्ण बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९२ टक्क्यांवर

मुंबईत दिवसभरात ५७ हजार ५३४ कोरोना चाचण्या  राज्य सरकार करत आहे. आता  या चाचण्या  मधूनच ७ हजार ८९५ कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत आतापर्यंत १ कोटी ४६ लाख २२ हजार ५३० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईत दिवसभरात ५७ हजार ५३४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधूनच ७ हजार ८९५ कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत आतापर्यंत १ कोटी ४६ लाख २२ हजार ५३० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तुलनेने अधिक आहे.मात्र  मुंबईत गेल्या २४ तासात २१ हजार ०२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २४ तासात ७ हजार ८९५ कोरोनाबाधितांची नोंद (Mumbai corona Update) झाली आहे. मुंबईत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर पुन्हा ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आज ४२ हजार ४६२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्य सरकारने कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत.
 
मुंबईत शनिवारी एकूण ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रविवारीसुधा ११ रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत १६ हजार ४५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत ९ लाख २० हजार ३८३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रविवारी ७ हजार ८९५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांमध्ये एकूण ६ हजार ६३२ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. दिवसभरात ६८८ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची दिलासादायक बाब आहे.
 
मुंबईत दिवसभरात ५७ हजार ५३४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधूनच ७ हजार ८९५ कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत आतापर्यंत १ कोटी ४६ लाख २२ हजार ५३० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.