शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (17:59 IST)

संपत्तीच्या वादातून बहिणीवर धारदार शस्त्राने वार केला, आरोपी भावाला अटक

विरार पश्चिम येथून पैसे खातर नात्याचा खून केल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे . येथे भाजी मार्केट परिसरात संपत्तीच्या वादातून एका भावाने आपल्या बहिणीवर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना 13 जानेवारी रोजी घडली आहे. ही घटना माया निवास परिसरातील सीसीटीव्ही कैमऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणात आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे. राजू माया असे या अटक केलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. माहितीनुसार आरोपीचे त्याच्या बहिणीसह बऱ्याच दिवसापासून संपत्तीवरून वाद सुरु होते. हे वाद दिवाणखान्याच्या भिंतीवरून झाले होते. आरोपीने आपल्या बहिणी स्मिता शहाच्या  घरात 13 जानेवारीला घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीची बहीण स्मिता   गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहे. आरोपी भावाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. विरार पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहे.