मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (08:03 IST)

अलिबाग शहरावर आता सीसीटीव्हीची नजर

CCTV eyes on Alibag city now
अलिबाग अलिबाग शहरावर आता 24 तार 32 कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. यासाठी निधी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे.हे पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे ठरत आहे. त्यामुळे अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दर आठवड्याला दहा हजारपेक्षा अधिक पर्यटक अलिबागमध्ये येतात. येथील पर्यटन स्थळांचा आनंद घेतात. तसेच वाढत्या नागरिकीकरणामुळे शहराचा विस्तार वाढत आहे. शहरामध्ये वेगवेगळ्या विभागाचे जिल्हा, तालुका कार्यालये आहेत. वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत. याठिकाणी कर्मचारी व विद्यार्थ्यांची वर्दळ असते.
 
शहरातील नागरिकांच्या व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. जिल्हा नियोजन समितीकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अखेर या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
 
लवकरच शहरात 32 ठिकाणी कॅमेरे बसविले जाणार आहेत. शहराच्या प्रवेशद्वारापासून सार्वजनिक ठिकाणी हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यावर अलिबाग पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, पोलीस नियंत्रण कक्ष यांचे नियंत्रण राहणार आहे. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी मंगळवारी दुपारी शहरातील वेगवेगळ्या सार्वजनिक जागांची पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक अनिल चोपडा,नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.