मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (15:51 IST)

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ठाणे आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान वीजप्रवाह काही काळासाठी खंडित

Central Railway Traffic Disrupted Power supply between Thane and Kanjurmarg stations interrupted for some time मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ठाणे आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान वीजप्रवाह काही काळासाठी खंडित
मध्य रेल्वे (central railway) मार्गावर वीजप्रवाह खंडित झाल्याने लोकल (local) सेवा विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेला जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. सकाळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेवरील ठाणे आणि कांजूरमार्ग (thane - kanjurmarg) स्थानकादरम्यान वीजप्रवाह काही काळासाठी खंडित झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर आता मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने सर्वच स्थानकांवर गर्दी झाली असून प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे.