बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (21:20 IST)

वडिलांचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करून मिळवले जात प्रमाणपत्र ; युवतीवर गुन्हा दाखल

वडिलांचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करून जात प्रमाणपत्र मिळल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिक उपविभागीय कार्यालयातील अधिकारी रविराज गोविंदराज रायकर यांच्या तक्रारीवरुन पूजा भोला भगवाणे (वय २०) या युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलद्वारे नाशिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यासाठी तिने वडिलांचे शाळा सोडल्याचा खोटा दाखला सादर केला. त्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवून त्याचा वापर विविध ठिकाणी केला. ही बाब उघड झाल्यावर चौकशीअंती तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करुन तिच्याविरुद्ध भादंवि कायदा कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.