सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (22:16 IST)

आम्ही ‘देशद्रोही दाऊद सरकार’ची होळी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांचा टोला

होळीचं निमित्त साधून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात पुण्यात आज होळी साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली. वाईट प्रवृत्ती जाळण्याचा दिवस म्हणजे होळी. त्यामुळे आम्ही ‘देशद्रोही दाऊद सरकार’ची होळी करत असल्याचा टोला पाटील यांनी लगावलाय.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले की, होळीचा सण साजरा करताना वाईट प्रवृती जाळल्या जातात. राज्यात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. कनेक्शन कापलं जातंय. मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहे. पुण्यात एका नेत्यानं एका मुलीवर बलात्कार केलाय. ती मुलगी सध्या गायब आहे. अशा वाईट प्रवृत्ती जाळण्याचं प्रतिक म्हणून होळी पेटवली. हे भ्रष्ट सरकार पायउतार होत नाही तोपर्यंत रोज आंदोलनं झाली पाहिजेत, हा संघर्ष सुरु राहिला पाहिजे, अशा शब्दात पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडी सरकारविरोधात रान पेटवण्याचे आदेश दिले.