शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (21:59 IST)

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने सोमवार पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.
 
मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर प्रवीण दरेकरांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. दरेकर यांच्या याचिकेवर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सत्र न्यायालयाने सोमवार पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले. यावेळी सरकारी वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे.
 
प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबै बँकेतील मजूर घोटाळा प्रकरणी फोर्ट येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये मुंबई बँकेची शाखा आहे. प्रवीण दरेकर हे मजूर नसताना मजूर म्हणून भासवले आणि निवडणूक लढवली याच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.