शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (15:43 IST)

मुलींना मारहाण करणाऱ्या गावगुंडाची काढली वरात

मुलीला मारहाण करणाऱ्या आरोपीला लातूर महिला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली. विवेकानंद चौक पोलिसांनी आरोपीला लाठीप्रसाद देत त्याची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. 
 
लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारने अल्पवयीन मुलीला फायटरने मारहाण केली होती. विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. तेव्हा तो ज्ञानेश्वर नगर परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी आरोपीला धिंड काढत पोलीस ठाण्यात आणले. महिला पोलिसांनी प्रमुख भूमिका बजावत या गुंडाला पोलिसांच्या गाडीतून न नेता त्याची धिंड काढून नेण्यात आलं.