शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (12:46 IST)

फडणवीसांचं नागपुरात जंगी स्वागत

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून यात चार राज्यांत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. गोव्यात देखील भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. मुख्य म्हणजे गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. 
 
आता या जोरदार विजयानंतर फडणवीस यांचे मुंबईनंतर नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले. फडणवीस यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विमानतळापासून एक रॅलीही काढण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की हा सत्कार मी स्वीकारतोय परंतु खरं श्रेय मोदींचं आहे. मी तर केवळ जी काही संधी मिळाली त्याचं सोन करण्याचा प्रयत्न केला.