सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (09:38 IST)

सोलापूरचा सुपुत्र छत्तीसगडमध्ये शहीद, दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण

सोलापूर जिल्‍हातील गौडगाव (ता. बार्शी) येथील बीएएसएफ मध्ये कार्यरत असलेले जवान रामेश्वर वैजनाथ काकडे हे रायपूर छत्तीसगड अतिरेकी हल्‍ल्‍यात शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांशी चकमकीत दोन हात करताना जवानाला वीरमरण आले.
 
रामेश्वर काकडे यांना अतिरेक्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गौडगाव पंचक्रोशीत शोककळा पसरली.
 
शहीद रामेश्वर काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगावचे मूळ रहिवासी होते.