गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (21:52 IST)

महाराष्ट्र सरकार हे काँग्रेसच्या दबावाखाली आहे :फडणवीस

Government of Maharashtra is under pressure from Congress: Fadnavis
काश्मीर फाईल्स चित्रपट राज्यात करमुक्तीबाबत  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी शिवसेनेवर टीका केली. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
 
“महाराष्ट्र सरकार हे काँग्रेसच्या दबावाखाली आहे. काश्मीरबाबत बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि आजचं उद्धव ठाकरेंच्या सरकारचं वर्तन यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. काश्मीरची काय अवस्था होती, हे ज्यांनी पाहिलंय त्यांना माहिती आहे. मी स्वत: वयाच्या १८व्या वर्षी मी काश्मीरला गेलो होतो. तिथली दैना मी बघितली आहे. ज्या प्रकारे तिथे अत्याचार झालेत, ते मीही जवळून बघितलं आहे. असं देशातलं सत्य एखाद्या सिनेमामुळे समोर येत असेल, तर काही लोकांना मिर्ची का लागते? ती यासाठी लागते की त्या वेळची त्यांची भूमिका ही किती संशयास्पद होती, जनविरोधी होती, देशविरोधी होती याचा पर्दाफाश होतो”, असं फडणवीस म्हणाले