रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (21:08 IST)

कोरोनाला गांभीर्यानं घ्या, अजित पवार यांचा इशारा

कोरोनाला गांभीर्यानं घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. चौथी लाट येऊ नये, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरण  वाढवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.  ज्या चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला, त्या चीनमध्ये आज पंधरा पेक्षा जास्त शहरं लॉकडाऊन  झाली आहेत. त्यामुळे कोरोला हलक्यात घेऊ नका, याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. तो आजार बाहेर पसरू नये. चौथी लाट येऊ नये अशीच सर्वांची अपेक्षा आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 
 
अजूनही काहीजण लसीकरणाबाबत प्रतिसाद देत नाहीत, ग्रामीण भागात कोरोनाला जास्त गांभार्याने घेत नाहीए, ही वस्तूस्थिती आहे. पण आपण लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे अशा सूचना अजित पवार यांनी केली आहे.