मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (15:45 IST)

अनिल परब यांचा फोन तपासा, त्यांच्या फोनमधून फडणवीसांना फोन गेला असेल

Deepak Vasant Kesarkar
पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते जे तुम्हाला वडिलांसमान मानत आहेत त्यांच्याबद्दल असं बोलत असाल, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होत असेल? अशी विचारणा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहेत. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंकडून शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने होत असलेल्या टीकेवर नाराजी जाहीर करत प्रत्युत्तरही दिलं.
आधी अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट, नंतर एकनाथ शिंदेंनी सांगितलं फोन कॉल करण्यामागचं नेमकं कारण; म्हणाले…

“उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला हे खरं आहे की खोटं समोर आलं पाहिजे. हर्षल प्रधान यांनी हे खोटं आहे असं सांगितलं. पण तसं असेल तर अनिल परब यांचा फोन तपासा. त्यांच्या फोनमधून फडणवीसांना फोन गेला असेल, तर नक्की तसं घडलं असेल. उद्धव ठाकरेंच्या फोनवरुन फोन केला जात नाही हे मला माहिती आहे,” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. जर शिंदेंना बाजूला करुन युती करायची असेल, तर मग भाजपाला नकार का देत होतात? अशी विचारणाही केसरकरांनी केली आहे.