रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आलेले 151 चेक बाउन्स

विविध सरकारी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतीचं आवाहन केलं जातं. मुख्यमंत्र्यांबरोबर छानछोक फोटो काढून सहाय्यता निधीसाठी चेकही दिले जातात. मात्र असे 151 चेक बँकेत वटलेच नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलं आहे. काही महाभागांनी तर खात्यात पैसे नसलेल्या आणि बंद असेलेल्या खात्याचे चेक सहाय्यता निधीला दिले आहेत. माहितीच्या अधिकारात जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती मिळवली आहे.
 
राज्यातील दुष्काळ, जलयुक्त शिवार अशा योजनांसाठी मुख्यमंत्री आवाहन करतात आणि त्याला जनतेतून प्रतिसाद येतो. काही जण स्वतःच्या खिशातून किंवा ट्रस्ट मधून पैसे देतात. पण हा देखील फक्त एक स्टंट असल्याचं समोर आलं आहे.सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे मुख्यमंत्र्यांना घसघशीत रक्कमेचा चेक द्यायचा, फोटो काढायचा आणि चेकच पेमेंट न करण्याचा सूचना बँकेला द्यायचा असाही प्रकार घडला आहे.