सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (19:21 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 9 एप्रिलला अयोध्या दौरा

eknath shinde
राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. शिवसेनेचे आमदार आणि खासदार देखील मुख्यमंत्री सोबत जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला मनमाड, नांदगाव या भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रेल्वेतून जाणार आहे. शिवसेना वतीनं मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आली आहे. ठाण्यातून अयोध्यासाठी आज दुपारी 4 ट्रेन निघणार आहे. या ट्रेन मधून मोठ्याप्रमाणात नागरिक जाणार आहे.  
 
Edited By - Priya Dixit