मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (17:07 IST)

Accident : एसटी बसच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

Accident   Near Atikeda in Nashik Chawand taluka One person died on the spot   ST bus
नाशिक -चावंड तालुक्यात आसारखेडा जवळ एसटी बसचा अपघात होऊन चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहे. तर महिला वाहकाचा जागीच मृत्यू  झाला आहे. या अपघातात  बसचा चुराडा झाला आहे. एसटी महामंडळाची बस वाणी गडावरून मनमाड कडे येत असताना चांदवड जवळ मतेवाडी येथे बसचा स्टीयरिंग रॉड तुटून बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस झाडावर आदळली. त्यात बसवरील महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू   झाला. या अपघातात चार ते पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही प्रवाशांना मार लागला आहे. सर्व प्रवाशांना चांदवडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
 
 Edited By - Priya Dixit