1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (21:16 IST)

ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा उडणार, निवडणूक आयोगाकडून झाली घोषणा

राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली.
 
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल.
 
नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल.