शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (15:56 IST)

मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर सांगली दौऱ्यावर

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर सांगली दौऱ्यावर आले आहेत. लष्कराच्या विमानाने ते कोल्हापूर सांगली या भागाची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. 
 
दरम्यान विमानतळावर त्यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, खा. संजय मंडलीक , आ. राजेश क्षीरसागर, समरजितसिंह घाटगे, महेश जाधव यांची भेट घेतली.
 
कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून सांगली जिल्ह्य़ातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या चार तालुक्यांना आणि सांगली शहर तसेच सातारा जिल्हय़ातील सातारा, कराड, पाटण, वाई या तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे.