मंगळवार, 10 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (12:42 IST)

Chief Minister Relief Fund: सहायता निधीवर राज्य सरकारचा निर्णय

eknath shinde
Chief Minister Relief Fund: विविध वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशिष्ट रकम मदतीच्या रूपाने दिली जाते. तातडीने मदत करण्याचा या योजनेचा उद्देश्य आहे. रकम कशी मिळवायचे अर्ज कुठे करायचा या बाबतीत माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना नसते त्यामुळे आता एका मिस्ड कॉल वर मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज मिळू शकेल.  
 
मुख्यमंत्री सहायता निधी रुग्णाच्या मदतीसाठी दिली जाते पण अनेकांना हा अर्ज कुठे करावा कसा करावा या बाबतची माहिती नसते. त्यावर राज्य सरकारने उपाय योजिले सून आता एका मिस्ड कॉल वर देखील मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज करण्यात येणार आहे. या साठी 8650567567 हा मोबाईल नंबर उपलब्ध आहे. या नम्बरवर मिस्ड कॉल दिल्यावर हा निधी तातडीने मिळणारे शक्य आहे. मिस्ड कॉलची सुविधा दिल्यामुळे ग्रामीण जनतेला मोठा फायदा होणार आहे. 

मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया, आजारांच्या उपचारासाठी आता पर्यंत 60 कोटीवर मदतनिधीचे वाटप करण्यात आले आहे. महिन्याभरात दीड ते 2 हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होतात. आवश्यक कागदपत्रे भरून अर्ज दाखल केल्यानंतर रकम आठ दिवसात वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते.
 
काय आहे अर्ज प्रक्रिया- 
 
दिलेल्या 8650567567 या मोबाईल नम्बरवर मिस्ड कॉल द्या 
अर्जाची लिंक समोर येईल. 
लिंकवर क्लिक केल्यावर अर्ज डाउनलोड होईल .
अर्जाची प्रिंट काढावी .
अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे देऊन पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून 
पीडीएफच्या स्वरूपात  cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाठवायचा.
या निधीतून गंभीर भाजलेल्या किंवा शॉक लागलेल्या रुग्णाला 50 हजार रुपयांची मदत दिली जाते. 
 

Edited by - Priya Dixit