गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मे 2023 (21:37 IST)

पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एकत्र येणार

dhanannay pankaja
भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे या भावा-बहिणीचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र, सध्या बीडमधील सहकारी साखर कारखाना निवडणुकीत हे दोन्ही राजकीय विरोधक एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे हो म्हणत त्यांची भूमिका मांडली. त्या  टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
 
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेत (शिंदे गट) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अधिक जागा मिळणार या सर्वेक्षणावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी कोणत्याही सर्व्हेवर काही टिपण्णी करणार नाही. दर दोन महिन्यांनी राजकीय परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे हे सर्व्हे काळानुसार बदल असतात. आत्ता तरी आम्ही सकारात्मक उर्जेने इकडून निघतो आहोत.”
 
Edited by : Ratnadeep Ranshoor