रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जानेवारी 2019 (16:43 IST)

मुख्यमंत्री यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या जन्मगावी साताऱ्याला येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री साताऱ्या दौऱ्यासाठी निघाले असता त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आले. दरम्यान या आधी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या घटना घडल्या होत्या.
 
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री साताऱ्यासाठी निघाले होते. दरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे साताऱ्यातील नियोजित कार्यक्रमाला पोहचण्यास उशीर होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.