1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Chief Minister's vehicle violated traffic rules

मुख्यमंत्र्यांच्या गाडीने वाहतूक नियमांचं उल्लंघन केले

Chief Minister
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांनी वेग मर्यादा ओलांडून वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं होतं. याबाबत त्यांच्यावर नियमानुसार 13 हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. मात्र हा दंड मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने माफ केला आहे. हा दंड बेकायदेशीरपणे माफ करण्यात आला असल्याचं आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांचं म्हणणं आहे.
 
एमएच सीपी 0037 आणि एमएच सीपी 0038 या दोन गाड्या आहेत. मुख्यमंत्री जेव्हा कुठे जातात, तेव्हा त्यांच्यासाठी वाहतूक थांबवली जात असते. मात्र यावेळी त्यांचे चालक सुसाट गाडी चालवत असतात. मुंबईत गाडी चालवताना वेग मर्यादा आहे. यावेळी मुख्यमंत्री यांच्या गाडीचा वेग नियम मोडणारा असतो.
 
 मुख्यमंत्री यांच्या गाडीबाबतही ई-चलन निघालं आहे. मात्र, हे पैसे मुख्यमंत्री कार्यालयातून वसूल करण्यात आले नाहीत. हे पैसे माफ करण्यात आलेत. मुख्यमंत्र्यांना मोठी सुरक्षा असते. ते नियम तोडू शकतात, असे वाहतूक विभागाचं म्हणणं आहे. तसं त्यांनी आरटीआयमध्ये कळवलं आहे .
पुढील लेख
इंस्टाग्रामवर मीटूला सर्वाधिक समर्थन