मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मानेच्या दुखण्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री HN रिलायन्स रग्णालयात दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी (10 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.
आज सकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया सुरु झाली होती. वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांच्या पथकानं सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी पाऊने नऊ वाजता ऑपरेशन यशश्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे.
रुग्णालयात दाखल होत असताना उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं होतं. या निवेदनात त्यांनी म्हटलं होतं, "दोन वर्षांपासून आपण कोव्हिडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय.
"कामादरम्यान, मान वर करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. आपण आजच हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहोत," असं मुख्यमंत्री म्हणाले होते.