काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदूंच्या अपमानाची सुपारी घेतली का? - राम कदम
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकात हिंदू धर्माची तुलना दहशतवादी संघटनेशी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदूंचा अपमान करण्याची सुपारी घेतली आहे का, असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आपण शनिवारी (12 नोव्हेंबर) घाटकोपर पोलीस ठाण्यात जाणार आहोत. ठाकरे सरकारला FIR दाखल करून घ्यावाच लागेल, असं कदम म्हणाले.
सलमान खुर्शीद यांचं हे नवं पुस्तक बुधवारी (10 नोव्हेंबर) प्रकाशित झालं होतं. पण त्याच्या काही वेळातच यावरून वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकाविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल झाल्याचीही नोंद आहे.