सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. त्यातच राजेंद्र पाटील या एसटी कर्मचाऱ्याचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान पाटील यांच्या मृत्यूमुळे एसटी कर्मचारी किती तणावाखाली आहेत हे दिसून येते, अशी कर्मचाऱ्यांच्यात चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र निवृत्ती पाटील वय ४६ राहणार कवलापूर असं या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. सांगलीमध्ये सुद्धा आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला राजेंद्र निवृत्ती पाटील हेदेखील होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झालं.
या दरम्यान ते एसटीच्या संपाबाबत सर्व कर्मचारी यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. तर आपल्या नोकरीबाबत ते विवंचनेत होते. एसटीचा संप लांबत चालल्याने पाटील हे तणावात होते. आज सकाळी ते घरीच असताना त्यांना चक्कर आली. यावेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सांगली सिव्हील हॉसेपिटलमध्ये दाखल केले. मात्र त्याठिकाणी त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले.