बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (15:29 IST)

एसटी कर्मचारी संप आंदोलन :किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर पोलिसांच्या ताब्यात

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.एसटी कर्मचारी आज मंत्रालयासमोर मोर्चा काढला जाणार आहे. मात्र या मोर्च्याला कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आलेली आहे मंत्रालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर हे या आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहे. यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र मोर्चा मंत्रालयात पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी सोमय्या आणि पडळकर यांना आमदार निवासस्थानातून बाहेर पडून मोर्च्यात सामील झाले आणि ठाकरे सरकारच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी  एसटीचे विलनीकरण करावे, ठाकरे सरकार हाय हाय, अशी घोषणा करण्यास सुरु केले. आमदार निवास स्थानातून बाहेर पडतातच पोलिसांनी पडळकर आणि सोमय्या यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हेन मध्ये बसवले. यावरून आंदोलकांनी गदारोळ केला. त्यांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केले आहे. सोमय्या आणि पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण तापले आहे. 
काहीही झाले तरी आम्ही कर्मचाऱ्यांसाठी लढू, त्यांना न्याय मिळवून देऊ. मुख्यमंत्र्यानी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा त्यांच्या मागण्या मान्य कराव्या.असे  सोमय्या  म्हणाले.