शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (11:14 IST)

मोठी बातमी ! मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घर कोसळले, अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले, बचावकार्य सुरू

मुंबईत आज सकाळी मोठा अपघात झाला. मुंबईतील अँटॉप हिल परिसरात आज सकाळी एक घर कोसळले असून काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, 9 जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
सध्या बचावकार्य सुरू आहे. मात्र, आतापर्यंत 9 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी हजर आहेत, मात्र त्याआधी ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अजून किती लोक अडकले असावेत याचा शोध घेतला जात आहे 
 
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की जे घर कोसळले आहे ते आधीच जीर्ण अवस्थेत होते. त्या घराचे सेफ्टी ऑडिट झाले की नाही हे तपासले जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सेफ्टी ऑडिट झाले नसेल तर जबाबदारांवर कारवाई केली जाईल. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, जेव्हा घर कोसळले तेव्हा सगळे घाबरले. एवढा मोठा आवाज झाला की, जणू  स्फोट झाला आहे  
 
जीर्ण घरांचे सेफ्टी ऑडिट बीएमसीकडून केले जाते 
जाते. ज्यांची घरे जीर्ण अवस्थेत आहेत अशा जमीनदारांना BMC सल्ला देते. मात्र याप्रकरणी अद्याप कोणीही काही बोलण्यास तयार नाही. सध्या संपूर्ण लक्ष मदत आणि बचाव कार्यावर केंद्रित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या अपघातास जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.