1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:44 IST)

बेस्ट’ कडून महिलांसाठी लेडीज स्पेशल 100 अतिरिक्त बस धावणार

मुंबईत काम करणाऱ्या महिलांना बऱ्याचदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्या अडचणींना दूर करण्यासाठी बेस्ट बस सेवा ने महिलांसाठी 100  अतिरिक्त बेस्ट बस सुरु केल्या आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाचा लेडीज स्पेशल बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला.हा सोहळा दादर येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला उपमहापौर सुहास वाडकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, आणि बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र उपस्थित होते.  कोरोनासंसर्गापासून मुंबईच्या सर्वसामान्य जनतेला बेस्ट कडून सेवा पुरविली जात आहे. दररोज बसने महिला वर्ग प्रवास करतो. त्यांच्यासाठी विशेष म्हणून महापालिकेकडून भाऊबीजेच्या मुहूर्तावर लेडीज स्पेशल 100 अतिरिक्त बस सुरू करण्यात आल्या आहेत.या बस संपूर्ण मुंबईत धावणार असून  विशेष म्हणजे की या पैकी 90 बस वातानुकूलित आहे. या बससेवेमुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.