गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (08:31 IST)

आर्यन खान प्रकरण घडवून आणलं ! त्याला 100 % अडकवले गेले, NCB चा साक्षीदार विजय पागारेंचा खळबळजनक दावा

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात दिवसेंदिवस नवी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे. याप्रकरणातील साक्षीदार (witness) विजय पगारे यांनी मोठा गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून दिली आहे. आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात 100 टक्के अडकवण्यात आले असून हे संपूर्ण प्रकरण घडवण्यात आले आहे, असा खळबळजनक दावा पगारे यांनी केला आहे. एवढेच नाही तर या प्रकरणात मोठी डील करण्यात आली होती, परंतु ती फसली अशी खळबळजनक माहिती पगारे यांनी दिली आहे.
विविध वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत विजय पगारे यांनी खळबळजनक माहिती दिली आहे.

विजय पगारे यांनी या कारवाईच्या आगोदर दोन दिवस आधी काय काय घडले याची सविस्तर माहिती दिली आहे.
ही माहिती देनाता अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला 100 टक्के अडकवण्यात आल्याचे छातीठोकपणे त्यांनी सांगितले. सुनील पाटील (Sunil Patil), मनीष भानुषाली  आणि किरण गोसावी  यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
किरण गोसावीने 50 लाख रुपये घेतले
आर्यन खान ड्रग्स प्रकरण ही संपूर्ण कारवाईच ठरवून केलेली कारवाई आहे. किरण गोसावी याने या प्रकरणात 50 लाख रुपये घेतले. या प्रकरणाच्या संपूर्ण डीलमधील काही रक्कम अधिकाऱ्यांना जाणार होती. सुनील पाटील हे मला स्वत: बोललेला आहे. सुनील पाटील याचे एनसीबीचे (NCB) प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याशी सतत बोलणं होत होते. माझ्यासमोरच हे बोलणे झालं आहे, असा खळबळजनक दावा पगार यांनी केला आहे.
तपास अधिकारी मनीष भानुशाली आणि सुनील पाटील यांची योग्य प्रकारे तपासणी केल्यास संपूर्ण प्रकरण बाहेर येईल, असेही पगारे यांनी सांगितले.

क्रूझवरील छाप्याच्या आधी नेमकं काय शिजलं
या प्रकरणाचा पर्दाफाश करताना पगारे म्हणाले की, सुनील पाटील याच्यासोबत मी मागील पाच सहा महिन्यांपासून काम करत आहे. ते माझ्यासाठी एक काम काढून देणार होते. त्यांना मी पैसेही दिलेले होते. मी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे पैसे मागत होतो. मी त्यांच्यासोबत ‘द ललित’ हॉटेलमध्ये (Hotel The Lalit) देखील थांबलो. केवळ ललितच नाही, तर आणखीही काही हॉटेलमध्ये मी त्यांच्यासोबत राहिलो आहे.