शुक्रवार, 1 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (13:35 IST)

राज ठाकरे यांचे नवीन घरात गृहप्रवेश

दिवाळीतील भाऊबीजेचा मुर्हत साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी साडेदहा वाजता नव्या घरात गृहप्रवेश केला. कृष्णकुंज’ शेजारीच त्यांचं हे नवं पाच मजली घर असून या नवीन घराचे नाव 'शिवतीर्थ' असून, सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज आहे. या घरात लवकरच राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह राहण्यास जाणार आहेत.
 
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याच्या हस्ते घराची पूजा करून गृहप्रवेश करण्यात आला. या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे.
 
पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे.