राज ठाकरे कोरोनामुक्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहेत. याआधी राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या मातोश्री कुंदाताई, बहीणदेखील कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जलील परकार यांनी ही माहिती दिलीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे 23 ऑक्टोबर रोजी समोर आले होते. त्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते. आज दुपारी त्यांची पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधक चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आला. यामध्ये राज ठाकरे कोरोनामुक्त झाल्याचे समजले. गेल्या शुक्रवारी कुंदाताई ठाकरे यांना तरे गेल्या शनिवारी राज ठाकरे आणि जयजयवंती देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी यापूर्वीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.