शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (08:15 IST)

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; १२ तासात आरोपी गजाआड

नवी मुंबईतील जुहूगाव येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस वाशी पोलिसांनी 12 तासात अटक केलीय. निलेश जाधव असे आरोपीचे नाव असून त्याला अटक केली आहे.
 
नवी मुंबईतील जुहूगाव येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस वाशी पोलिसांनी 12 तासात अटक केलीय. निलेश जाधव असे आरोपीचे नाव असून त्याने ओळखीचा फायदा घेत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावत तिला स्वतःच्या घरी घेऊन जात जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच सदर प्रकार कोणालाही सांगू नको अशी धमकी दिली. पीडित मुलीने सर्व प्रकार आईला सांगितल्याने पीडित कुटुंबीयांनी वाशी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. वाशी पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीला कौशल्यपूर्ण तपास करून त्याचा सहभाग निश्चित झाल्याने अटक केली. यासंदर्भातील माहिती नवी मुंबई पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.