शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (18:30 IST)

माथेफिरूच्या हल्ल्यात 2 ठार व 4 जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील खान कंपाऊंड गैबी नगर येथील रहेमनीया मस्जिद परिसरात ही घटना घडली आहे. अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्ला करणाऱ्या माथेफेरूचे नाव असून या हल्ल्यात कमरुजमा मोहम्मद इस्लाम (वय 42) व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान (वय 29) या दोघांची हत्या झाली आहे.

शुक्रवार असल्याने दुपारच्या नमाज पूर्वी सर्व घरात असताना सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास माथेफेरू आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी याने कमरुजम्मा अन्सारी यांच्या घरात शिरून चाकूने हल्ला केला. घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारा इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर हा त्याठिकाणी आला.

माथेफेरूने त्यावर व घरातील कमरुजमाची पत्नी हसीनाबानो, मुले रेहान, आरिफा व आरीबा यांच्यावर सुद्धा चाकूने हल्ला करीत सर्वांना जखमी केले. त्यानंतर आरोपी परिसरतील आपल्या घरात गेला. परिसरातील नागरिक धावून येत त्यांनी हल्लेखोर असलेल्या घराला बाहेरून कडी लावून कोंडून ठेवले. या घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी यास त्याच्या घरातून पकडून ताब्यात घेतले.