रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (21:43 IST)

राज ठाकरे यांच्यावर असे सुरू आहेत उपचार डॉक्टर यांनी दिली माहिती

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. राज यांच्यासह त्यांच्या आई आणि बहिणीला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार राज यांच्यासोबतच त्यांची बहीण आणि आई यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या राज यांच्यावर डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येस असून तीन तासानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी खुद्द डॉ. पारकर यांनी ही माहिती दिलीय.
 
राज ठाकरे तीन तासांत घरी जाणार 
“त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या बहिणीलाही कोरोनाची लागणी झाली आहे. दोघेही रुग्णालयात दाखल झाले आहेत. आम्ही त्यांना मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. ते तीन तासांत घरी जातील. त्यांना घरीच क्वॉरन्टाईन केले जाईल. त्यांच्या आईदेखील रात्री रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनाही आम्ही अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. तीन तासानंतर राज यांना घरी सोडले जाईल,” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे. 
 
मोनोक्लोनल अँटिबॉडी काय आहे ?
नोक्लोनल अँटिबॉडी हे औषध कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येत आहे. यामध्ये दोन अँटिबॉडीजचे मिश्रण आहे. लीलावती रुग्णालयात हेच औषध राज ठाकरे यांना देण्यात येत आहे. या औषधामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज नाही. तसेच ते लवकर बरे होतील.
 
राज ठाकरेंच्या मातोश्रींनी आज सकाळीच लीलावती रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या आई या दोघांना करोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या कुटुंबातील किंवा घरातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना करोनाची लागण झाली असून इतर सदस्यांपासून त्यांनी घरातच विलगीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.