मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (15:53 IST)

राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते : गुरु माँ कांचन गिरी

गुरु माँ कांचन गिरी आणि जगतगुरु सुर्याचार्यजी यांनी  मुंबईत कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते, अशी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे हे जे बोलतात ते करतात, असं गुरु माँ कांचन गिरी म्हणाल्या.
 
जो बोलण्यावर ठाम नाही, त्याच्यासोबत चर्चा करुन वेळ फूकट घालवत नाही. आम्ही त्यांच्यासोबत आहोत जे त्यांच्या बोलण्यावर ठाम आहेत. राज ठाकरे यांना आधिपासून ओळखते. बाळासाहेब ठाकरे यांना भेटले होते. बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा राज ठाकरेंमध्ये दिसते. ते जे बोलतात ते करुन दाखवत आहेत. जो बोलण्यावर ठाम आहे तो राष्ट्राची सेवा करतो. जो बोलण्यावर ठाम नाही, निर्णय घेताना ठाम नाही तो देशसेवा करु शकत नाही. आपल्या पदासाठी, आपल्या सरकारसाठी राष्ट्राला धोक्यात घालत असाल, त्या लोकांना आम्ही कधीही सहकार्य करणार नाही, असं गुरु माँ कांचन गिरी म्हणाल्या.