केरळात पुराच्या पाण्यात काहीच क्षणात घर वाहून गेलं ,व्हिडीओ व्हायरल
केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाची चित्रे चित्त थरारक आहेत.आतापर्यंत पूर, पाऊस आणि भूस्खलनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. केरळ राज्यातील कोट्टायमचा एक व्हिडिओही समोर आला आहे. कोट्टायच्या मुंडकायममध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे एक घर वाहून गेले. घर वाहून गेल्याचा व्हिडिओ राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाची कथा सांगत आहे. केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान 27 जणांचा मृत्यू झाला आहे.आणि 8 लोक बेपत्ता आहे.केरळच्या पूरग्रस्त विविध भागातून 22 मृतदेह आढळले आहेत. या पैकी कोट्टायम मधून 13 आणि इडुक्की येथून 9 मृतदेह सापडले आहे.
काल संध्याकाळी केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात एक घर वाहून गेले.रस्त्यावरील उभ्या लोकांनी या वाहणाऱ्या घराचा घटनेचा व्हिडीओ काढला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीच नव्हते.
या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे आणि पाण्याचे वेग जास्त आहे.या नदीच्या काठावर एक पक्के घर अचानक पाण्यात कोसळे आणि बघता बघता वाहून गेले.