सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (15:29 IST)

गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांची घेतली भेट

गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली. दरम्यान हिंदू राष्ट्र बांधणीसाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. यातच दिवाळीनंतर राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. गुरू माँ कांचन गिरी यांच्या भेटीदरम्यान राज ठाकरेंच्य़ा अयोध्या दौऱ्यावरही चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
 
दरम्यान गुरू माँ कांचन गिरी यांनी मी राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचं निमंत्रण देणार असल्याचे यापूर्वीचं स्पष्ट केले होते. तसेच साधू-संत-महंतांच्या हजेरीत त्यांचे भव्य स्वागत करणार असल्य़ाचेही सांगितले होते. त्यामुळे भाजपा-मनसेच्या युतीच्या चर्चांदरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य आणि त्यांचे सहकारी जगभरात हिंदू धर्माच्या प्रसार आणि प्रचार करत असतात. यापूर्वी देखील माँ कांचन गिरी दिवंगत शिवेसना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्रात आल्या होत्या.