मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (17:31 IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.  
 
मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनची लागण झाली आहे. सध्या दोघांवरही ठाकरे यांच्या राहत्या घरी उपचार सुरु आहेत.
 
दौर्याात राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही
कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाहीमहापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे सक्रिय झालेले आहेत. गेल्या काही काळात त्यांनी पुण्याला मोठ्या प्रमाणात दौरे केलेत. फक्त पुणेच नाही तर नाशिकचाही राज ठाकरेंनी दौरा केलेला आहे. बहुतांश ठिकाणी राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही.