शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (22:21 IST)

येत्या 23 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे.
 
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या मेळाव्याची माहिती दिली आहे. 23 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा आहे त्यात तुमची देखील काही उत्तर मिळतील. राज ठाकरे मेळाव्यात काय बोलतील हे माहीत नाही. पण ते आपली भूमिका जाहीर करतील आणि बऱ्याचशा गोष्टी या क्लिअर होतील, असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.